पुणे येथील नळ स्टॉप रस्त्यावरील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील १० ते २० लाख आधी डिपॉझिट भरा असे मगच रूग्णालयात दाखल करू असे मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरने सांगितले. त्यामुळे गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणी भाजपा आमदार अमित गोरखे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रूग्णालयाची तोडफोड केली. तर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दिनानाथ मंगेशकर रूग्णालयावर मोर्चा काढला.
ही घटना घडल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाने स्वतःची चौकशी समिती स्थापन केली. या चौकशी समितीने आपल्या अहवालात भलतीच दावे करत संबधित डॉक्टरला वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत असून महिलेच्या मृत्यूला मृत महिलाच जबाबदार ठरविण्याचा ओंगळवाणा प्रकार दिनानाथ रूग्णालयानेकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
रूग्णालयाने अहवाल दिलेल्या माहितीनुसार, १) ईश्वरी भिसे ( रूग्णाचं नाव) २०२० पासून रूग्णालयात उपचारासाठी येत होत्या. २) २०२२ साली सदर महिलेवर चॅरिटीचा लाभ घेऊन ५० टक्के खर्च कपातीतून शस्त्रक्रिया झाली होती. ३) २०२३ साली सुखरूप प्रसुती होणार नसल्याने दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता. ४) रूग्ण महिलेनं एएनसी तपासणी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात केलेली नाही. ५) १५ मार्च रोजी रूग्ण महिला डॉ घैसास यांना भेटल्या, प्रसुती जोखमीची असल्याचे सांगत दर सात दिवसांनी तपासणी सांगितली. त्याप्रमाणे २२ मार्चला त्या येणं अपेक्षित होतं. पण त्या तपासणीसाठी आल्या नाहीत. ६) २८ मार्चला रूग्ण महिला, रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात तपासणीसाठी आली तेव्हा परिस्थिती सामान्य होती, तेव्हा जोखीम पाहता रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला होता.
तसेच पुढील उपचारासाठी १० ते २० लाख रूपये खर्च येणार असे रूग्ण महिलेच्या नातेतवाईकांना सांगितलं. तेव्हा त्यांनी भरती करून घ्या पैशांचे प्रयत्न करतो असे सांगितले.
डॉक्टर केळकरांनी त्यावर तेवढे पैसे भरा, असं सांगितले. पण रूग्ण महिलेच्या नातेवाईकांनी न सांगाताच रूग्णालयातून निघून गेल्याचे समजलं. पैशाची तजवीज न झाल्यास ससून रूग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ घैसास यांनी दिला होता. २८ मार्चनंतर काय झाले. याबद्दल डॉ घैसास वा रूग्णालयाच्या प्रशासनाला काहीच माहिती नव्हती. माध्यमातील माहितीनुसार २८ मार्चला रूग्ण आधी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सूसून आणि तिथून सुर्या हॉस्पीटलला स्वतःच्या गाडीने गेली होती. तिथे भरती झाल्यानंतर २९ मार्चला सकाळी सिझेरियन प्रसूती झाली. सुर्या रूग्णालयातील माहितीनुसार आधीची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भातील माहिती तिच्या नातेवाईकांनी लपवून ठेवली. उपचाराच्या खर्चाचे अडव्हान्स मागितल्याच्या रागातून हि तक्रार केलेली दिसते रूग्णाच्या मृत्यूमुळे आलेल्या निराशाही त्यासाठी कारणीभूत असल्याचं मत समितीने मत अहवालात नमूद करण्यात आला.
दरम्यान, डॉ घैसास आणि मृत महिलेचा पती सुशांत भिसे यांचे सीडीआर तपासावेत, डॉ केळकर आणि सुशांत भिसे याचंही तपासावं जेणेकरून खरा प्रकार लक्षात येईल, आता रूग्णालय त्याची चुकीची बाजू खरी असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न करत आहे. तसेच मृत मनिषा भिसे हिला कॅन्सर झाला होता असा दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा दावा धांदात खोटा असल्याचा खोटा असल्याचे भाजपा आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
याप्रकरणावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हिमंत असेल तर भिसे कुटुंबाकडून ज्या डॉक्टरांची नावे घेतली जात आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी असे आव्हान राज्य सरकारला देत तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना टाकण्याची आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल त्यावेळी तुमच्याकडे कावळाही ढुंकून पाहणार नाही अशी टीका करत त्या मृत महिलेचे तुम्हाला शाप लागण्याशिवाय राहणार नाही असेही खोचकपणे सांगितले.
Marathi e-Batmya