देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाळपोळ प्रकरणी कठोर कारवाई करणार… सीसीटीव्हीत दिसणाऱ्यावर ३०७ कलमान्वये कारवाई

मराठा आंदोलन चिघळत असताना जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या तिथे मुळीच गय करणार नाही. बीडमध्ये आमदारांची घरे गाड्या जाळणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजमधून पटवण्यात येत असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे ३०७ कलम लावून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

आज दुपारी मंत्रिमंडळा बैठकीत पुढील महत्वाच्या विषयांवर निर्णय झाल्या नंतर अधिकाऱ्यांना बैठक दालना बाहेर जाण्यास सांगण्यात आले व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांबरोबर राजकीय चर्चाही केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे डेंग्युने आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित नव्हते.

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार क्षीरसागर तसेच आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरांवर जे हल्ले झाले, जी जाळपोळ झाली तो जीवे मारण्याचाच प्रयत्न होता. पोलिस अशा प्रकाराची गय करणार नाहीत. यात काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही आढळून येत असून त्या सर्वांना ताब्यात घेईपर्यंत पोलिस कारवाई थांबणार नाही. राजकीय कार्यकर्ते कोण होते कोणत्या पक्षाचे होते याची माहिती लवकरच दिली जाईल असेही सांगितले.

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *