Breaking News

धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती… ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

आमदार अभिमन्यू पवार यांसह आमदार प्रकाश आबिटकर, आमदार बच्चू कडू, आमदार श्वेता महाले आदी सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले होते.

पीएम किसान योजनेत राज्यातील ६५ हजार शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ई-केवायसीच्या कारणावरून वंचित राहिल्यासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत संबंधित ६५ हजार शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही विधानसभेत सांगितले.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी याबाबत राज्यस्तरावरून तसेच केंद्रस्तरावरून विविध मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील, तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार असल्याचीही घोषणाही यावेळी केली.

आमदार अभिमन्यू पवार यांसह आमदार प्रकाश आबिटकर, आमदार बच्चू कडू, आमदार श्वेताताई महाले आदी सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले होते.

Check Also

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित प्रसाद लाड-अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपा सदस्य प्रविण दरेकर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *