डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी
हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दहा स्मारके बांधण्याची राज्याची क्षमता आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राज्याची तिजोरी अक्षरश: खिळखिळी करुन टाकली आहे. राज्य गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. यावरुन त्यांची राज्याप्रती आस्था दिसून येते अशा शब्दात जोरदार टिकाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *