राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्रीयन जनतेच्या भावनाही दुखावल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित राज्यपाल पदावरून हटवा किंवा त्यांची इतरत्र बदल करा अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी केली राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे केली.

भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्य सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही त्यांनी केला.
राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही राष्ट्रवादीने दिला.

दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *