अजित पवार अर्थात दादा पर्वाचा अस्त…..विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते पार्थिवाला मुखाग्नी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात महाराष्ट्रातील जनतेचे दादा यांचे काल विमान बारामती विमानतळावर उतरताना क्रॅश होऊन अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेते तथा सहकारी उपस्थित राहिले.

तसेच माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही अजित पवार यांच्या कुटुंबिय अर्थात खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेत सांत्वन केले.

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत कळताच बारामती मधील सर्वच भागातील नागरीक अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासास्थानाकडे शेवटच्या अंत्य दर्शनासाठी जमा झाले होते. अजित पवार आणि जनतेचे भावनिक नाते आणि लाखो नागरिकांचे अजित पवार यांच्यावरील प्रेम दाखवून दिले.

विधिवत पद्धतीने अत्यंसंस्काराच्या वेळी अजित पवार यांच्या पार्थिवावर मंत्रोच्चाराने संस्कार करण्यात येत होते. यावेळी राज्यातील आणि राष्ट्रीयस्तरावरील राजकीय नेते हे अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार हे अंत्यसंस्काराची विधी पार पडत असताना अजित पवार यांना मानणाऱ्या समर्थक आणि गावातील नागरिकांकडून अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे, एकच वादा अजित दादा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला जात होता.

अखेर अजित पवार यांना त्याचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिल्यानंतरही अंत्य संस्काळाच्या निमित्ताने जमलेला जनसमुदाय काही हलायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

शेवटी शेवटी तर मुखाग्नी शांत होत आला तरी  विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जमा झालेले लोक जागचे हलायला तयार नसल्याने अखेर पवार समर्थकांकडून माईकवरून अनाऊंसमेंट करत नागरिकांना शिस्तीत बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत होते.

तसेच अत्यंयात्रेत सहभागी झालेल्या बारामती करांचा अश्रूपूर काही केल्या थांबायला तयार नव्हता. तसेच या भागातील नागरिक हमसून हमसून रडत अजित पवार यांच्याबद्दलच्या आठवणी आणि त्यांच्या प्रती भावना व्यक्त करत होत्या.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *