सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई असा परिवार आहे. मागील दोन-तीन निवडणूकांपासून महेश कोठे यांनी विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून विधानसभेत जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु महेश कोठे यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यामुळे त्यांचे आमदारकीचे स्वप्न अधूरेच राहिले.
एकेकाळी विष्णुपंत कोठे हे सोलापूरातील काँग्रेसचे अर्ध्वयू होते. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशिल कुमार शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. विष्णूपंत कोठे यांचे सुपुत्र म्हणून महेश कोठे हे सुरुवातीला ओळखले जात होते. मात्र नंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आणि नंतर सतत सातवेळा ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून सोलापूर महापालिकेवर निवडूण गेले, या कालावधीत त्यांच्या वडिलांप्रमाणे त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी राजकिय ओळख निर्माण केली. त्यामुळे सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती पण खरी सत्ता महेश कोठे आणि त्यांचे वडिल विष्णूपंत कोठे यांचीच होती असे नेहमी बोलले जात असे.
परंतु नंतरच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशिल कुमार शिंदे यांच्यात आणि विष्णूपंत कोठे, महेश कोठे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर शहराच्या राजकारणातून कोठे घराणे काहीसे बाजूला फेकल्याचे दिसून आले. मात्र शहराच्या राजकारणात महेश कोठे हे टिकून राहिले.
मध्यंतरीच्या काळात महेश कोठे हे शहर दक्षिण मधून विधानसभा निवडणूकीची तयारी करत होते. त्यादृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशही केला. मात्र त्यांच्या प्रवेशाला महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शरद पवार यांचे जूने सहकारी तथा मित्र सुशिल कुमार शिंदे यांनी विरोध केल्यानंतर महेश कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिलेला असतानाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिलेला नसल्याची माहिती अजित पवार यांना त्यावेळी देण्याची पाळी आली होती. त्यानंतर महेश कोठे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढविली.
त्यानंतर शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर महेश कोठे यांनी पुन्हा एकदा विभाजीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. परंतु महेश कोठे यांचा थोडक्यात पराभव झाला. मात्र महेश कोठे यांच्या थोरल्या भावाचे राजेश कोठे यांचे चिरंजीव देवरकोंडा कोठे हे सोलापूर शहरातून भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. परंतु महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न अधूरेच राहिले.
दरम्यान, प्रयागराज येथे पार पडत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी महेश कोठे हे गेले होते. मात्र आज सकाळी तेथे कडाक्याच्या थंडीत गंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असता आंघोळ करताना तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त येताच शरद पवार यांनी महेश कोठे यांना सोशल मिडीयावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
Marathi e-Batmya