सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पदोन्नतीतील १००% रिक्त जागा भरणार आरक्षित जागांसह तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयही जाहिर करण्यात आला आहे. मात्र पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबतची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने हि सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

रिक्त असलेली पदोन्नतीतील १०० टक्के पदांपैकी सर्व आरक्षित वर्गांकरीता ३३ टक्के पदे आहेत. यापूर्वी हि आरक्षणातील पदे वगळून खुल्या प्रवर्गातील पदे फक्त सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात याविषयीची याचिका प्रलंबित असल्याने आणि अद्याप त्यावर लगेच निर्णय होण्याची शक्यता नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून हि पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पदोन्नतीतील रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात येणार असली तरी ती २००४ च्या शासन निर्णयानुसार भरण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यानुसार मागासप्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहिर करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ

लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *