हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूण येथे पार पडणार असून या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील उमेदवार सहभागी होणार आहेत.

या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या शिबिरात सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का? युसीजीच्या नव्या नियमावरून नोकरदार वर्गाला परखड सवाल

युजीसीच्या (युनियन ग्रॅन्ट कमिशन अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग) नवीन नियमावलीला होत असलेला विरोध आणि सुप्रीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *