Breaking News

हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा, लव्ह जिहाद प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा नवा कायदा आसामसाठी आणणार

मागील १० वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाने रान माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात भाजपाला राजकिय यशही मिळाले. मात्र आता आसाम मध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात जन्मठेपेची शिक्षा देणारा नवा कायदा आणणार असल्याची घोषणा केली आहे.

आसाम मधील भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आम्ही निवडणुकीदरम्यान ‘लव्ह जिहाद’बद्दल बोललो होतो. लवकरच, आम्ही असा कायदा आणू, जो अशा प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा देईल. लवकरच नवीन अधिवास धोरण आणले जाईल, ज्या अंतर्गत केवळ आसाममध्ये जन्मलेले लोक राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील.

पुढे बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, निवडणूकपूर्व आश्वासनानुसार प्रदान करण्यात आलेल्या “एक लाख सरकारी नोकऱ्या” मध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले आहे, जे संपूर्ण यादी प्रकाशित झाल्यावर स्पष्ट होईल असेही सांगितले.

आसाम सरकारने हिंदू आणि मुस्लिमांमधील जमीन विकण्याबाबतही निर्णय घेतला असल्याचे सांगत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, सरकार अशा व्यवहाराला रोखू शकत नसले तरी पुढे जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची संमती घेणे बंधनकारक केले आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *