सोलापूरात दूषित पाण्याचा परिणामः दोन मुलींचा मृत्यू तर तिसरी मुलगी गंभीर दुषित पाण्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात

मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर महापालिका आणि राज्यकर्त्ये हे अपयश ठरले. त्यातच सोलापूर महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अनेक वार्ड ऑफिसर्सना तक्रारी करण्यात आल्या. तर काही स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या या दूषित पाणी पुरवठ्याच्या विरोधात आंदोलनेही केली. पण सोलापूर महापालिकेडून कारवाई काहीच झाले नाही. त्यातच मोदी परिसरातील बाबू जगजीवनरा नगर झोपडपट्टी मध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे दोन मुलींना आपले प्राण मुकावे लागले असून तिसऱ्या मुलीची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती पुढे आली आहे.

बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी पुरवठा सोलापूर महापालिकेकडून होत आहे. या पाण्यामुळे भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे (१६) अशा दोन मुलींचा मृत्यू झाला. तर जयश्री महादेव म्हेत्रे हिची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेचे वृत्त कळताच भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार हे बाबू जगजीवनराम नगरमध्ये पोहोचले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे या ही पोहोचल्या. मागील काही दिवसांपासून बाबू जगजीवराम नगर झोपडपट्टी परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यास आमदार देवेंद्र कोठे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या पालिका आयुक्त आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दोन निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिका आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या दोन मुलींच्या मृत्यूवरून या भागातील स्थानिक नागरिकांकडून रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण बनल्याचे दिसून आले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *