Breaking News

जयराम रमेश यांचा आरोप, महसूल कमाविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केला आरोप

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नरेंद्र मोदी सरकारने लाखो तरुणांचे भविष्य केवळ “महसूल वाढवण्यासाठी” त्यांच्या वर्षे वाया घालवल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून आज केला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनटीएवरील प्रश्नावर ३१ जुलै रोजी राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री सुकांता मजुमदार यांच्या उत्तरावरून ही टीका केली.

जयराम रमेश पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) एनईईटी NEET परिक्षा घोटाळ्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ही शिक्षण मंत्रालयाची एक संस्था आहे ज्याचा एकमेव उद्देश खाजगी विक्रेत्यांकडे आउटसोर्सिंगद्वारे कार्य करणे आहे, अशी टीकाही यावेळी केली.

पुढे जयराम रमेश म्हणाले की, केवळ या विक्रेत्यांकडे अनेकदा संशयास्पद ओळखपत्रे असतात असे नाही, तर नॅशनल टेस्टींग एजन्सी NTA स्वतः मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असलेल्या एका व्यक्तीच्या नेतृत्वात आहे, ज्यांच्या काळात मेगा घोटाळे झाले आहेत, असेही यावेळी सांगितले.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हणाल्या की, एनटीएने NTA ने अंदाजे ३,५१२.९८ कोटी रुपये गोळा केले, तर परीक्षा आयोजित करण्यासाठी ३,०६४.७७ कोटी रुपये खर्च केले. “त्यामुळे गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा एनटीएला झाल्याचे सांगितले.

यावर जयराम रमेश म्हणाले, या कॉर्पस निधीचा वापर एजन्सीची क्षमता स्वतः चाचण्या घेण्यासाठी किंवा एजन्सीच्या सक्षमतेसाठी वारला गेला नाही की विक्रेत्यांवरील देखरेख-नियंत्रणासाठी खर्च केला गेला नसल्याचा आरोपही यावेळी केला.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, नॉन बायलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकराने महसूल वाढीचा एक नवा पायंडा पाडला असून भारतातील लाखो तरुणांचे भविष्यातील हे फक्त महसूल वाढविण्यासाठीच वापरला गेल्याची टीकाही यावेळी केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत