Breaking News

जयंत पाटील यांची खोचक टोला, अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अजित पवार यांनी सांदर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसतोय. आता पराभव समोर दिसत असताना, आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट असल्याची टीका केली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेट पेक्षा ४६ हजार कोटींचे अधिकची प्रोव्हिजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मागच्या वर्षी १ लाख ३० कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट २० हजार कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे असा टोलाही यावेळी लगावला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा दल वाढवले जाईल असे म्हणत असताना महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलेले आहे असा ठपकाही ठेवला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एमएससीबीची मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचे लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की, हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू असा विश्वासही व्यक्त केला.

वारीला २० हजार रूपयांचे अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबारायांनी वारीसाठी नाजरणा पाठवला होता. त्यावेळी तुकाराम महाराजांनी त्यास स्पर्श न करता तो परत पाठवला. आणि त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांना मोठी परंपरा आहे. उत्स्फूर्तपणे लोकं वारी प्रतिसाद देतात. त्याला राजकारणासाठी जोडणे योग्य नाही अशी टीकाही सरकारच्या निर्णयावर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी

राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *