शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवार ९ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आयोजित आक्रोश मोर्चाचे अंबादास दानवे हे नेतृत्व करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत.

२०१७ साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी. नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरीत मिळावे.२०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी. विहिरी दुरूस्तीसाठी खचलेल्या बुजलेल्या विहीरीसाठी अनुदान मिळावे आदी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर समस्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम

निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *