Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, स्ट्रॅटेजी कशी जाहिर करणार आम्ही उद्या सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे खोटे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच २९३ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर भाजपा प्रणित एनडीला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीला मिळत असलेल्या जागा यावरून भाजपाचा ४०० चा नारा आणि २५० बहुमताचा आकड्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगले यश मिळताना दिसत आहे. जरी त्यांनी विरोधक म्हणून आमची बँक खाती आमच्या सील केलेली असली तरी असे सांगत आमची लढाई नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होती असेही सांगितले.

तसेच पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, निवडणूक काळात आम्हाला अनेक अडचणींचा सामना करत निवडणूकीला सामोरे जावे लागले. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यासारख्या राष्ट्रीय मुद्यावरून आम्ही निवडणूक लढली.

त्यावर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने प्रश्न केला की, मग तुम्ही सरकार स्थापन करणार की पुन्हा विरोधात बसणार त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आमची पुन्हा एक बैठक इंडिया आघाडीच्या नेत्यासमवेत होणार आहे. त्यानंतर आम्ही यासदर्भात अधिक सविस्तरपणे बोलू असे स्पष्ट केले.

त्यावर आणखी एका प्रतिनिधीने भाजपालाही बहुमत सिध्द करण्याइतपत जागा मिळालेल्या नसल्याचा उपस्थित करताच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आम्ही पुढे काय करणार आहोत हे इथे पत्रकार परिषदेत कसे सांगणार जर आम्ही सगळ्या गोष्टी जर इथेच सांगितले तर नरेंद्र मोदी हे आधीच हुशार बनतील ना असे सांगत उद्या सगळ्या आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्याबाबत बोलणे योग्य होईल.

दरम्यान, राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली येथील लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्याबाबत कोणत्या मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार असले विचारताच राहुल गांधी म्हणाले की, यासंदर्भात वायनाड आणि रायबरेलीतील जनतेशी चर्चा करेन आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

https://x.com/INCIndia/status/1797965625366589460

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *