मनोज जरांगे पाटील म्हणाले, वाटलं नव्हतं फडणवीस असं वागाल, आता तुमचा सुफडा… मराठ्यांच्या माय माऊलींनी रात्री मुलांला जवळ घेऊन बसा आणि विचार करा

निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण जाहिर करा अन्यथा आम्ही आमची भूमिका आचारसंहितेनंतर जाहिर करू अशी घोषणा मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आज राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होत राज्यातील आचारसंहिताही आजपासून लागू करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या गोर-गरिब पोरांना रस्त्यावर आणि उघड्यावर आणण्याचा डाव काही जणांनी आखला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे ही आता सामील झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत मला वाटलं नव्हतं देवेंद्र फडणवीस असे करतील म्हणून पण तुम्ही आमचा अपमान केलात ना आता तुमचा सुफडा साफ झालाच म्हणून समजा असा स्पष्ट इशारा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, या मराठा समाजाने त्यांचे १०६ आमदार निवडूण विधानसभेत पाठवले. मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने आमचा अपमान केला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. अपेक्षित होतं की किमान देवेंद्र फडणवीस तरी मराठा समाजाचा अपमान करणार नाहीत. मात्र त्यांनी मराठ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील लहान-मोठ्या पोरा-बाळांच्या आईने आज रात्री आपल्या पोराच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःला प्रश्न करावा की, ज्या भाजपाच्या उमेदवारांना जात-पात धर्म बघून मतं दिली, त्या पक्षाने पोरांचे भविष्य घडविण्यासाठी आरक्षण दिलं का, की त्या आमदाराने त्यासाठी काही केलं का असा प्रश्न स्वतःला करावा असे आवाहन करत आता त्यांचा सुफडा करायचा असल्याचे जाहिरपणे सांगितले.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आज जरी ते सत्तेत असले तरी त्यांना मतदान आपण करणार आहोत. त्यांना मतदान करणारे कहे काही कुठून येणार नाहीत किंवा त्यांना मतदान करायला ते कोणाला आणणार नाहीत. त्यामुळे सत्ता त्यांची असूनही आरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला नाही. आता निवडणूक जाहिर झालेली असल्याने त्यांच आता सगळं संपलं असून आता कोणाचा मामा-भाऊ सख्खा लांबचा, परका आता असला विचार करू नका, जो आपल्या पोरा बाळांच्या हितासाठी मदत करणार नाही, रस्त्यावर आणणाऱ्यांच्या सोबत तो आमदारकीला आपल्याकडे मतं मागायला येणार असेल तर ते भावनिक व्हायचं आता सोडून द्या असे स्पष्ट आवाहन मराठा समाजाला आवाहन करत जो समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्या पक्षाचा उमेदवार असेल त्याला मतदान करायचे नाही असे आवाहनही करत अशानेच त्यांचा सुफडा साफ करायचा असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *