काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाचे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठविलेल्या अर्धनग्न फोटोवरून राजकिय वाद रंगलेला असतानाच या प्रकरणाला आता ब्लॅकमेलिंगचे वळण मिळाले आहे. त्यातच या प्रकरणी आरोपीचा संबध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे नाव घेत या प्रकरणाला राजकिय वळण देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सदर महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. पण हा विषय पारदर्शकपणे हाताळला गेला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही वेळापूर्वी एका विषयाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव घेतलं. तसेच सुप्रिया सुळे यांचंही नाव घेतले. विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक दोन फोन केला केले असतील, पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरु आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, जे खरं आहे ते लोकांसमोर यायला हवं असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, विधानसभेत एका व्यक्तीने हक्कभंग प्रस्ताव मांडत असताना सभागृहाला चुकीची माहिती दिली. हे चुकिचं असल्याचे आज आम्हाला सांगायचंय, हे सांगण्याचा अधिकार आहे. एखाद्या महिलेवरील अत्याचारा विषय तुमच्यापर्यंत आला असता तर तुम्ही देखील त्यावर बोलले असते, मला सभागृहात आणखी एक विषय मांडायचा आहे. एक मातंग समाजाचा व्यक्ती आहे. ते स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. भिसे नावाचं कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांच नाव वापरून जमिन हडपण्यात आली आहे. अशा प्रकारे जमिन हडपली जात असेल तर आणि आम्हाला बोलू दिलं जात नसेल तर त्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार असा सवालही यावेळी केला.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. जी कारवाई आमच्यावर करता किंवा ज्या चौकश्या आमच्या करत आहात, पण हे गरिबांचे विषय आहेतते देखील या मंत्र्यांच्या विरोधात आहेत. याबाबत कोणी बोलणार आहे का असा सवाल करत याची चौकशी तुम्ही करणार आहात का जर खऱ्या अर्थाने विषयांवर चौकशी झाली तर तरच सभागृहात संविधान जिवंत राहणार आहे, असं आम्ही समजू. पण फक्त विरोधक आहोत म्हणून आमच्यावर ही कारवाई आणि जे सत्तेत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल तर हे योग्य नाही असेही यावेळी सांगितले.
‘भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर विधिमंडळात बोलण्याची संधी मिळाली. यावेळी संविधान, सद्यस्थिती आणि सामान्य माणूस या विषयावर प्रकाश टाकताना सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांनीच संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आणि… pic.twitter.com/fenfpR6YmN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 25, 2025
Marathi e-Batmya