राणे म्हणतात अब आयेगा मजा..सबका हिसाब होगा नारायण राणे आत्मचरीत्र लिहीत असल्याचे नितेश राणे यांचे ट्विट

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत. या आत्मचरित्राच्या माध्यमातून सगळ्यांचीच गुपिते बाहेर पडणार असल्याचे भाकित त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे केले असून अब आयेगा मजा..सबका होगा हिसाब असल्याचे सांगत राणेंचे चरित्र स्फोटक असल्याचा गर्भित इशारा दिला. त्यामुळे राजकिय पटलावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमदार नितेश राणे यांनी बुधवारी दुपारी ट्विट केले. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.
शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नारायण राणे यांनी युतीचे सरकार असताना मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आघाडीची सत्ता असताना त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नवीन पक्षाची स्थापना केली. सध्या ते भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार आहेत. आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *