Breaking News

नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींनी माझी पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे आणि मी त्यांना सांगितले आहे की रविवारी शपथविधी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. मी शपथविधीपूर्वी मंत्र्यांची यादी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ते त्यांच्या पुढील सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये एकवाक्यता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतील आणि एनडीए ही ‘प्रथम राष्ट्र’ या तत्त्वाशी वचनबद्ध असलेली एक आघाडी आहे असे प्रतिपादन केले. सभागृहातील बैठकी आधी नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे दिग्गज लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी त्यांचा नेता म्हणून निवड केली आहे, असेही नरेद्र मोदी यांनी सांगत पुढील १० वर्षात एनडीए सरकार सुशासन, विकास, जीवनाचा दर्जा आणि सामान्यांच्या नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप यावर लक्ष केंद्रित करेल असे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परस्पर विश्वास हा या युतीचा गाभा आहे आणि ‘सर्व पंथ समभाव’ (सर्व पंथ समान आहेत) या तत्त्वाशी बांधील आहेत.

पंतप्रधान पदासह अन्य मंत्र्यांचा शपथविधी ९ जून रोजी रविवारी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.

तत्पूर्वी संसदेत आयोजित एनडीए आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानात अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती आपले अतूट समर्पण व्यक्त केले, जे कोट्यवधी लोकांना आशा, शक्ती आणि प्रतिष्ठा देते. आपल्या विनम्र सुरुवातीबद्दल अनेकदा बोलणारे नरेंद्र मोदी, संविधानाच्या परिवर्तनीय शक्तीवर जोर दिला.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या उदात्त मूल्यांचे पालन करण्यासाठी समर्पित आहे.

संविधानाच्या सर्वसमावेशक स्वरूपावर प्रकाश टाकून नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, माझ्यासारख्या गरिबीत आणि मागासलेल्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला संविधानामुळेच देशसेवा करण्याची संधी मिळाली. आपली राज्यघटना कोट्यवधी लोकांना आशा शक्ती आणि सन्मान देते असेही यावेळी सांगितले.

https://x.com/narendramodi/status/1799064097742578164

Check Also

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *