Breaking News

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची फेरनिवड होणार अर्ज दाखल ३० एप्रिल रोजी अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत फक्त शरद पवार यांचाच अर्ज पक्षाकडे आला आहे. त्यामुळे ३० एप्रिल रोजी शरद पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवडीची औपचारीक घोषणा फक्त बाकी राहीली आहे.

दर तीन वर्षाने पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला लोकशाही मुल्याप्रमाणे सुरुवात होत असून आज राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा जाणता राजा अशी ओळख असलेले देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्याच अनुषंगाने शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. ३० एप्रिल रोजी मतमोजणी होवून अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.

दरम्यान पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही निवड होणार असून २९ एप्रिलला निवडणूकीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीतच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार आहे.

अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, नगरसेवक राखी जाधव, सईदा खान, माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार मिलिंद कांबळे उपस्थित होते.

 

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *