Breaking News

नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या, हायब्रीड बियाणं लावलं की उत्पन्न वाढतं पण… काँग्रेसने ज्या चुका केल्या त्या आपल्याला करायच्या नाहीत

संपूर्ण भाजपात स्पष्टवक्ते आणि दिलखुलासपणे पक्षातील अंतर्गत बाबींवर किंवा धोरणांवर जाहिरपणे भाष्य करणारे नितीन गडकरी यांच्यासारखा दिलखुलास व्यक्ती भाजपामध्ये कोणीच नसल्याचे बोलले जाते. त्याचा प्रत्यंत्तर नुकताच आला. मात्र नितीन गडकरी यांनी यावेळी त्यांच्या जाहिर वक्तव्यातून भाजपा कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या देत म्हणाले पूर्वी एक बरं होतं, काहीच नव्हतं, त्यामुळे थोडक्यात समाधान व्यक्त करायची पध्दती असायची. परंतु आज काळ बदलला आणि जिथे सायकलवर फिरायचो तेथे मर्सिडीज आली, यश मिळालं, पण पूर्वीचे संघर्षाचे दिवस अद्याप विसरलो नाही, आणि जूने संघर्षाचे दिवस विसरायचेही नसतात असा सल्ला भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

गोव्यात भाजपाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, अनेक वर्षे संघर्ष केला त्यानंतर भाजपाला आज हे यश पहायला मिळत आहे. मात्र संघर्षात नसलेलेही आत यश बघुन भाजपात येत आहेत. पूर्वी यासंदर्भात मी एकदा लालकृष्ण अडवानी यांना विचारलं होते की, पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय, काँग्रेस आणि भाजपात फरक काय, तेव्हा अडवाणी मला म्हणाले होते की, ज्या चुका काँग्रेसने केल्या त्या चुका करायच्या नाहीत. आपणही तेच जर केलं त्यांच्या जाण्याचा आणि आपण येण्याचा फायदा काय? आपलं वेगळंपण लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यांच्यावर नाराज होऊन लोकांनी आपल्याला निवडणूक दिलं आणि निवडूण आल्यानंतर आपणही तेच काम करायला नको तेच करत राहिलो तर आपल्या येण्यात काय फायदा असे सांगत चांगले दिवस आले की आपण संघर्षाचे दिवस विसरतो. आणि या चांगल्या दिवसातच घरं उद्धवस्त होतात, जसे आपण हायब्रीड बियाणं लावली की, उत्पन्न वाढतं. पण जसं हायब्रीड बियाण्यांचा वापर वाढतो तशी झाडांवर रोगराई वाढते. वाईट दिवसात आनंद वाढतो, संपन्नतेच्या काळात सुखः टिकवणं गरजेचं असतं असे सांगत भविष्यातील उद्दीष्ट लक्षात ठेवून काम केलं पाहिजं असे सांगत भाजपा कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मराठी भाषेत एक प्रसिध्द लेखक आहेत. शिवाजी सावंत, त्यांनी मृत्यूंजय कादंबरी लिहिली असून त्यात त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलं असून विस्मृची ही देवानं माणसाला दिलेली देणगी आहे. जीवनातील कटू गोष्टी विसरता आल्या पाहिजेत, भविष्यात काही चांगलं करायचं असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमान काळात त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि भविष्याचे निर्णय घेतले पाहिजेत असे सांगत सध्या आपल्या पक्षात सध्या अनुकूल काळ असल्याचे उदाहरण देत मात्र आपण संघर्ष विसरायला नको असे सूचक उद्गार काढले. त्यामुळे या दोन्ही उदाहरणांचा संदर्भ देत नितीन गडकरी यांनी नेमके कोणाला उद्देशून ही उदाहरण दिली यावरून सध्या राजकिय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *