Breaking News

त्या टीकेवरून गाडी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला जितेंद्र आव्हाड यांची टीका, संभाजीराजे छत्रपती रक्ताचे वंशज, मी विचारांचा वंशज

विशाळगडावर अतिक्रमाणाच्या नावाखाली संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पायथ्य़ाशी रहात असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या दुकानावर आणि मस्जिदीची नासधुस करण्याचा प्रयत्न केला. त्य़ावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच संभाजी राजे यांचे वडील खासदार छत्रपती शाहु महाराज आणि काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी भेट घेत नागरिकांना दिलासा.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाला भेट देत नागरिकांना दिलासा दिला.

या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी खासदार संभाजीराजे यांच्यावर टीका केली. त्यावरून संभाजीराजे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला केला. सुदैवाने जितेंद्र आव्हाड यांना कोणतीहा दुखापत झाली नाही. दरम्यान आव्हाडच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिसांची गाडी सोबत असताना हा हल्ला हल्लेखोरांनी केला.

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले…

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर घडलेली घटना ही खासदार छत्रपती शाहू महाराज यांना देखील पटलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका घेतली. संभाजी भिडेनं ठरवलं, दुस-या संभाजीनं ते केलं. मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही. संभाजीराजे छत्रपती रक्ताचे वंशज आहात, मी विचारांचा वंशज आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा खेळ चालायचा, तो वेगवेगळी रुपे घेऊन यायचा, महाराष्ट्राला एवढा मोठा बहुरूपी कलाकार मिळाला. त्यांचे कानटोप्या घातलेले, गॉगल लावलेले फोटो काढूनही ठेवले होते. माणसाच्या चारित्र्यात हे सगळं रचलेले असते. ते किती रूप बदलू शकतात, करायचे तर निधड्या छातीने करायचे..मी कोणाला घाबरत नाही, जे करतो समोर करतो, केले म्हणजे केले अशी नक्कलही यावेळी केली.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, जे काही केले टोपी घालून, गॉगल घालून, रेनकोट घालून. महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्यापेक्षा महाराष्ट्राला भूषवणारा चांगला उपमुख्यमंत्री मिळायला हवा. माणूस म्हणून जगायचं असेल ताठमानेने जगा, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून आपला वेश बदलायचा म्हणजे तुम्ही स्वत:ला बदलताय. यापुढे बहुरूपी म्हणून चित्रपटात चांगली ऑफर येऊ शकते. नशीब दाढी वाढलेले फोटो पाठवले नाहीत अशी टीकाही यावेळी केली.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्याचसोबत ही बातमी एका खासदाराच्या घरी जेवताना तिथल्या पत्रकारांना सांगितली. बातमी हायलाईट कशी झाली नाही यासाठी फोनही केले. माझी बातमी लावा याची किती हौस, महाराष्ट्राच्या विकासाची बातमी लावायची होती. मी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही. त्याची भरपाई महाराष्ट्राला मदत करेन. मी महाराष्ट्राची क्षमा मागतो. मी भाजपा नेतृत्वाला भेटायला रात्री १ ला जायचो, ५ वाजता परत यायचो. ते मी केले परंतु जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही हे सांगायचे होते. वेशभूषा करून गेलो, याच्या तुम्ही बातम्या का लावत नाहीत असं विचारायचं असेही यावेळी सांगितले.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, दरम्यान, लोकशाहीत आपल्या आधार कार्डावरचं नाव बोर्डिंग पासवर नसणे, तिकिटावर नाव नसणे याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या आधारकार्डावर अजित अनंतराव पवार असं असेल तेच नाव बोर्डिंग पासवर हवं. दुसरं नाव छापलेच कसे, ज्या एअरलाईन्सनं दिलं त्यांनाही गुन्ह्यात घ्या. उद्या कुणीही अतिरेकी नाव बदलून जाईल. तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहे त्याला काही किंमतच नाही. राष्ट्रीय सुरक्षेची मस्करी लावली का? हे गांभीर्याने घेतले पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी कायद्याचे तुकडे तुकडे केले. उपमुख्यमंत्री होण्यासाठी काकाला ढकलून द्यायचं होतं. ए अनंतराव पी हे खोटं नाव ऐकून मला हसू आलं असंही सांगितले.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राहुल गांधी यांच्या वडीलांनी व आजीने देशासाठी रक्त सांडले, त्यांचीच जात भाजपाने काढली. हा देश व ही माती राहुल गांधी यांची जात आहे. दिल्लीतील नवीन संसद भवन पावसामुळे गळतय. तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही पक्षातर्फे ६०० छत्र्या व रेनकोट रवाना करणार. सिल्लोडच्या आमदारांकडून आधी माफी मागून घ्यावीत्यानंतर ताई, माई, अक्का व इतर महिलांचे मेळावे घ्यातुमच्या मनातील भावना महाराष्ट्राने ओळखली असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *