राजकारण

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा निकाल www.mahresult.nic.in या …

Read More »

कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबर पासून सुरु करण्यास मान्यता स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याची सूचना- कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु …

Read More »

अखेर आजपासून दुकाने ११ पर्यंत तर हॉटेल्स १२ वाजेपर्यत खुली राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परस्थिती आटोक्यात आल्याने परिस्थिती पूर्वरत करण्याच्या अनुशंगाने दुकाने आणि हॉटेलच्या वेळा वाढविण्याचे संकेत काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्कफोर्स समोबतच्या बैठकीत दिले. त्यानुसार आजपासून सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यत तर उपहारगृहे, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट १२ वाजेपर्यत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. यासंदर्भात आज दुपारी राज्य सरकारकडून …

Read More »

नाना पटोलेंची अंतर्गत टीम तयार नवनियुक्त पदाधिका-यांकडे सोपविल्या जबाबदा-या काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे, तर मिडिया कम्युनिकेशन जाकिर अहमद यांच्याकडे

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची …

Read More »

पाटलांची जीभ घसरली आता पाय घसरला जाऊ नयेः आर्यनचे ते व्हिडिओ जाहिर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका आणि मागणी

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आज अखेर चंद्रकांत पाटील यांनी आपली जीभ घसरल्याचे मान्य करत त्याबाबत जाहिरपणे दिलीगिरी व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक म्हणाले की, …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचे संकेत तर टोपेंकडून थेट वेळाच जाहिर राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यात कोरोना बाधित आढळून येण्याच्या संख्येत चांगलीच घट होताना दिसत आहे. तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, उपाहरागृहे, दुकानांच्या वेळात वाढ करण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट वेळाच जाहिर करत दुकानांच्या वेळा रात्री …

Read More »

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रयत्न भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे …

Read More »

एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दादरा नगर हवेलीतील दहशतीला फोडली वाचा

सिल्वासा : वृत्तसंस्था-प्रतिनिधी मला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्त निर्माण झालंय आणि काही लोक गांजा मारून काम करतात, हे दिसतय.. दसरा मेळव्यानंतर मला वारंवार दिसतय की, ज्या प्रकारे विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की …

Read More »

मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या की जनतेच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मागील सहा महिन्यापासून सातत्याने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत देशातील जवळपास १२ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने १०० री ओलांडली असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दर कमी झाले होते. त्यावेळी गुजरात मध्ये झालेल्या …

Read More »

नातू मुख्यमंत्री ठाकरेंच्या नजरेतून आजोबा प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे …

Read More »