मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात आलेली दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचे सारे श्रेय तुम्हा जनतेचे आहे. तिसरी लाट कधी येईल कोणत्या तारखेला येईल याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचं असल्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. तसेच प्रत्येक गावच्या संरपंचाने …
Read More »आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप
नागपूर-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. हे सांगत असताना कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे सांगत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणुन मागील दिड वर्षात सरकार मागासवर्गीय समाजाचे संवैधानिक चौकटीतील निर्णय घेत नाही हे दिसून …
Read More »मोदींचे धोरण म्हणजे लसीसाठी पैसेवाल्यांना पंचतारांकीत सुविधा तर गरिबांसाठी रांग देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा …
Read More »केंद्राच्या फेरविचार याचिकेत मराठा आरक्षणाचा उल्लेखच नाही: राजेंना वेळ द्या पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याचे आवाहन- मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये ‘मराठा आरक्षण’ या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ १०२ व्या घटनादुरुस्ती पर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला ‘एसईबीसी’ आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या …
Read More »ओबीसी आरक्षण : आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र विधानसभेतील …
Read More »काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …
Read More »सोशल मिडियाला संपवणं आणि लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा खेळ लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहणाचा भाजपाचा कुटील डाव- नवाब मलिक
मुंबई्: प्रतिनिधी व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. केंद्र सरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणं हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »अजित पवार म्हणाले थकित २४ हजार कोटींच्या रकमेसह या सवलती द्या कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत द्या
मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्व राज्ये कोविडविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी …
Read More »तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम दिल्लीत मराठा गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …
Read More »जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले हे अधिकार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास …
Read More »
Marathi e-Batmya