वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …
Read More »गतीमान सरकारने सांस्कृतिक खात्याला दिले पाच वर्षात १४ संचालक संचालकांची नियुक्ती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संगीत खुर्चीचा खेळ
मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाचवर्षापूर्वी गतीमान सरकार पारदर्शक सरकारचा नारा देत आलेल्या भाजपा-शिवसेनेने अगदीच गतीमान कारभार करत गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदी पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करत “संगीत खुर्चीचा” रेकॉर्ड ब्रेक खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. खात्यात अथवा एखाद्या महामंडळात किमान दोन वर्षे तरी …
Read More »इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका
अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …
Read More »राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …
Read More »संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा शपथनामा प्रकाशित दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा जाहीरनामा
मुंबईः प्रतिनिधी रयतेचे राज्य आणण्यासाठी १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेत स्वराज्याची स्थापना केली. तीच प्रेरणा घेऊन शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना ५ हजार रू. महिना बेकारीभत्ता आणि नव्या उद्योगात भूमीपुत्रांना ८०% नोक-या, दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, व उद्योगाला चालना यामी …
Read More »भाजपाने रासपला फसविले, धोका दिला महादेव जानकर यांच्या निमित्ताने महायुतीतील खदखद बाहेर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेने गतवेळच्याप्रमाणे महायुतीची घोषणा केली. या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधानसभेच्या जागा दिल्या नसल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगत आम्हाला फसविल्याचा जाहीर आरोप भाजपावर केला. महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला …
Read More »प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी आरेप्रकरणी कुठे गेले? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा खोचक सवाल
मुंबईः प्रतिनिधी आरेत वृक्षतोड होत असताना प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी कुठे गेले?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत ही वृक्षतोड म्हणजे मुंबईकरांना नाक दाबून मारण्याचा प्रकार असल्याची टीका केली. गेली २५ वर्षे शिवसेना जीव घेत होती. आता भाजपसोबत युती करून सामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहे असा …
Read More »ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनानंतर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा कोथरूडमधील उमेदवारी मागे घेण्याचे संघटनेची तयारी
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी कोथरूडमधील स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा अर्थात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला. तसेच पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. मात्र याप्रश्नी बैठक होत ब्राम्हण महासंघाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाने पाटील यांच्या विरोधातील भूमिका मागे घेत त्यांना …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya