मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मंत्र्याकडे आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायांना नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जून्या मंत्र्यांच्या कडच्या अनुभवाचा फायदा नव्या मंत्र्याकडे करून घेण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात रूजू होण्याऐवजी आजारपणाच्या सुट्टीवर जाणे पसंत केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्र्यांकडे विशेष …
Read More »देशात भाजपा विभाजनकारी मानसिकता आणतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. आज संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं …
Read More »टिसच्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी टाटा इन्स्टि्यूट ऑफ सोशल सायन्स, (टिस) यांच्याकडून गोवारी समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासाचे काम सूरु असून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर शासन स्तरावर त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. विधानसभा अध्यक्ष यांना प्राप्त झालेल्या गोवारी समाजाच्या निवेदनानंतर या संदर्भात …
Read More »हैद्राबादेतील चकमकीचे भाजपा, काँग्रेसकडून स्वागत तर शिवसेना-राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया कायदे तज्ञ, विचारवंतांकडून चिंता
मुंबईः प्रतिनिधी हैद्राबाद येथील एका तरूण महिला डॉक्टरवर बलात्कार करून तीला जाळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात पडत असून भाजपा आणि काँग्रेसच्या महिला नेत्या आणि आमदाराने स्वागत केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्याने चकमकीवरून राजकिय वातावरण …
Read More »उपमुख्यमंत्री पदामुळे खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर शिवसेनेची यादी तयार काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमेकांकडे बोट
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून आठवडा होत आला आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचे खातेवाटपही होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असल्याने मंत्र्यांच्या खात्याचे वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार …
Read More »नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रवादीची ८० लाख रूपयांची मदत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी होणार मदतीचे वाटप करणार
मुंबईः प्रतिनिधी मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हेक्टरी ८ आणि १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. …
Read More »मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंना चैत्यभूमीवर जाण्यास वेळच नाही भाजपा नेते आ. भाई गिरकर यांची खंत
मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास ते गेले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांचे डॉ.बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी असल्याची टीका भाजपा नेते …
Read More »दिव्यांगांसाठी वेगळा विभाग आणि महापोर्टल बंद करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या …
Read More »केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …
Read More »अभिनंदनावेळी मुख्यमंत्री म्हणाले “मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो” संसदीय भाषेत मुख्यमंत्री ठाकरेंची फडणवीसांवर टोलेबाजी
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya