राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्ताविक नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी नाणार प्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घुसून जोरदार घोषणा दिल्या. यामुळे विधानभवनातील सुरक्षा रक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा,कोकण वाचवा अशा गगनभेदी घोषणानी विधानभवन दणाणून गेले. यावेळी आंदोलकांना सुरक्षा यंत्रणेने …
Read More »भाजपमध्ये आलेल्या २८ वाल्मिकींमुळे आमदार व त्यांच्या पत्नीचे जीवन धोक्यात भाजप आमदार अनिल गोटे यांचा स्वपक्षांवरच विधानसभेत टीका
मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या वाल्मिकींमुळे माझे व माझ्या पत्नीचे जीवन धोक्यात आल्याची गंभीर बाब …
Read More »कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मुख्यमंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळासमोर मांडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. याबाबतीत कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना वरील त्यांनी आरोप केला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम (२००५) …
Read More »खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांना विनंती सरकारच्या विनंतीनंतर विरोधक दुष्काळावरील चर्चेत सहभागी
मुंबई : प्रतिनिधी मराठा आणि धनगर समाजाला द्यावयाच्या आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडत नाही. तोपर्यंत विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. तरीही कामकाज रेटण्याच्या उद्देशाने दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेला सरकारच्यावतीने सुरुवात केली. परंतु हा महत्वाचा विषय असल्याने विरोधकांच्या गैरहजेरीत चर्चा करणे योग्य होणार नसल्याचे मत भाजपचे माजी मंत्री …
Read More »मंत्र्यांनो कॉलेज, शाळांमध्ये कधी अभ्यास केलाय का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मंत्र्यांना मिश्किल सवाल
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा अहवाल मागितला अभ्यास सुरु आहे, धनगर समाजाचा अहवाल विचारला तर मंत्र्यांचा अभ्यास सुरु असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिले जाते. सभागृहात असलेल्या मंत्र्यांनी शाळा, कॉलेजात कधी अभ्यास केलाय का? असा मिश्किल सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पणन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव …
Read More »सरकारचा हेतू स्पष्ट नसल्यानेच अहवाल सभागृहात मांडत नाही विरोधकांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापासून राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाच्या शिफारसी सभागृहात ठेवणार असल्याचे जाहीर केले. तर सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते एटीआर सभागृहात मांडणार असल्याचे सांगत असल्याने मराठा, धनगर …
Read More »अहवालात दडलय काय? विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारला सादर करण्यात आलेला राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याची विरोधकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे दोन्ही अहवाल सभागृहात मांडायला तयार नाही. त्यामुळे या अहवालात दडलय तरी काय ? असा सवाल …
Read More »मान्य केलेल्या पुरवण्या मागण्या रद्द करुन नंतर चर्चा घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे …
Read More »आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल …
Read More »चर्चेसाठी सरकारच्या विरोधकांना मिनतवाऱ्या विरोधकांकडून सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणासंद़र्भातील टीसचा अहवाल मांडवा या मागणीवरून विरोधकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य बनल्याने अखेर राज्य सरकारकडून विरोधकांना भर सभागृहातच कामकाज चालवायचे असल्याने विरोधकांनी आंदोलन सोडून चर्चेला येण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विरोधकांना मिनतवाऱ्या करण्यात येत …
Read More »
Marathi e-Batmya