राजकारण

अनिल परब यांचा गंभीर आरोप, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार मंत्र्याने तात्काळ राजीनामा द्या तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी त्यांचे आरोप ऐकले नाहीत

विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील सर्व डान्सबार बंद असताना हा एकमेव बार कसा सुरु असा सवाल करत या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेत विचारले असता अनिल …

Read More »

धमकीच्या मुद्यावर बोलू न देता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सगळे आमदार माजलेत असे… पडळकर-आव्हाड प्रकरणाच्या पडसादावरील चर्चेत बोलताना व्यक्त केली भूमिका

पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना …

Read More »

पडळकर-आव्हाड प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय अधिवेशन काळात अभ्यागंताना प्रवेश बंदी, पडळकर-आव्हाडांना खेद व्यक्त करायला लावला

काल संध्याकाळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाच्या इतिहासतील काळी घटना घडवून आणली. त्यानंतर विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पडळकर-आव्हाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा विधान परिषदेतही या प्रश्नी विरोधकांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, कोणाच्या हातात दिलात महाराष्ट्र ? भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »

अनाथ मुलांबाबत आमदार रईस शेख यांच्या प्रश्नावर मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन अनाथ बालकांना शिक्षण मोफत, नोकरीतही आरक्षणाची अमंलबजावणी

अनाथ विद्यार्थ्यांना मिळत नसलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर लाभ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने तत्काळ शासन निर्णय काढून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. यामुळे अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ मिळणार …

Read More »

प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवेदनाद्वारे माहिती

शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात …

Read More »

नाना पटोले यांचा विधानसभेत गौप्यस्फोट, मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्र पेन ड्राईव्ह दाखवित मंत्री, अधिकारी गुंतल्याचा आरोप

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …

Read More »

केंद्रा नंतर राज्यातही भाजपाची दांडगाई, विरोधी आमदार समर्थकाला मारहाण भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला मारहाण

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात विशेषतः विधिमंडळात कितीही टोकाची एकमेकांवर टीका केली किंवा शाब्दिक हल्ले चढवले. तरी राज्याच्या राजकारणात शाररीक दृष्ट्या एकमेकांवर हल्ला करण्याचे काम आता पर्यंत कोणत्याही राजकिय पक्षाच्या आमदाराने विधिमंडळाच्या आवारात कधी केले नाही. पण केंद्रातील शासकिय यंत्रणांचा गैरवापर करत इतर राजकिय पक्षातील नेत्यांवर दादागिरी करणाऱ्या पंतप्रधान …

Read More »

नरहरी झिरवाळ यांची घोषणा, गुटखाबंदीच्या अंमलबजावणीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिली माहिती

राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य श्रीकांत …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणार मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती

मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील …

Read More »