राजकारण

बाळासाहेब थोरात यांचाही लाव रे तो व्हिडीओः २५००० नागरिकांचा भव्य विराट मोर्चा अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात कडाडले

राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे २५००० नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा …

Read More »

अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात

साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …

Read More »

कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकऱणी केली टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेचे आव्हान…शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) …

Read More »

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी सकाळी ८ ते रात्रो ११ वाजेपर्यत वाहनांना नो एन्ट्री

गणेशोत्सवासाठी मुर्तीचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द

चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात… ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या

राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा …

Read More »

अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा घेतला आढावा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …

Read More »