राजकारण

नाना पटोले यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा

राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला …

Read More »

आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊईके यांचे विधानसभेत निवेदन

आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री डॉ अशोक ऊईके म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावी राहून उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे, याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. या …

Read More »

अमित शाह यांना खुष करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा नारा कार्यक्रमाला भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित नारा दिला

राज्यात एका बाजूला मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटलेला असतानाच आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अर्थात पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. विशेष म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय हिंदचा नारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माईक सोडून गेले होते. मात्र पुन्हा लक्षात येताच माईकवर पुन्हा येत एकनाथ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहंचे गुलाम महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा …

Read More »

नरहरी झिरवळ यांचे आश्वासन, अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार लक्षवेधी प्रश्नावरील चर्चे दरम्यान दिले आश्वासन

राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होणार होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली

राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील ईएसआयसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दुरुस्ती व नूतनीकरण काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. या …

Read More »

उदय सामंत यांचे स्पष्टीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासात सिडकोची सकारात्मक भूमिका पनवेलमधील एक ते ११ इमारतीचे पुनर्विकास होणार

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर एक ते अकरा क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक आहे. संबंधित सोसायट्यांनी पूर्वी बंगल्यांसाठी अथवा रो हाऊससाठी मिळालेल्या प्लॉटवर बहुमजली इमारती उभारल्या आणि त्यामधील सदनिकांची विक्री केली. त्यानंतर सिडकोने अशा इमारती नियमित करण्यासाठी धोरण आणले असून, काही प्रकरणे याअंतर्गत नियमितही करण्यात आली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार,४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपाचे आमदार गोपीचंद …

Read More »

राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही, बोगस शिक्षकभरतीची एसआयटी चौकशी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटीची स्थापना करणार

शिक्षण विभाग म्हणजे संस्कारांची खाण असते. सुविद्य नागरिक शिक्षणातूनच घडतात. पण अशा शिक्षण विभागात लुटारूच बसलेले आहेत, असे आज शिक्षण विभागाबाबत केलेल्या आरोपांमुळे  आणि मंत्रीमहादयांनी देखील ते मान्य केल्यामुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाराची खाण बनलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या सहभाग असलेल्या एसआयटी कडून चौकशी करण्यात येईल …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; मोफत वाळू वितरणाचीही हमी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर

राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ …

Read More »