भाजपाच्या हिंदी सक्तीच्या अजेंडाविरुद्ध आज उभा महाराष्ट्र एकवटला असताना ही एकजूट होऊ नये आणि भाजपच्या महाराष्ट्र व मराठी द्वेषी धोरणाविरुद्ध मराठी माणूस लढा उभारू नये यासाठी सत्ताधारी मंडळी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवून तसेच चुकीचा संदर्भ देऊन कसं उपद्रव माजवत आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपाचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, पहिलीपासून हिंदीचे विद्यार्थ्यांवर दडपण नको ५ जुलैच्या मराठी भाषेच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेणार
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, …
Read More »जोजो थॉमस यांची मागणी, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा आमदार गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन समाजाबद्दलचे द्वेषपूर्ण भाषण घटनेला आव्हान
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्य सरकारला इशारा
एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला. …
Read More »उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …
Read More »शरद पवार यांचा विरोध, पहिली ते चौथी इयत्तेत हिंदी भाषा सक्ती करणं योग्य नाही हिंदीची सक्ती नको, महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेश नाही
पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग
भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र …
Read More »न्यू यॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या त्या वक्तव्यावर भारतातून आणि भारतीयांकडून टीका गुजरातमध्ये फारसे मुस्लिम राहिले नाहीत-जोगरान ममदानी यांचा दावा
जोहरान ममदानी यांनी गुजरातमध्ये फक्त काही मुस्लिम शिल्लक आहेत या दाव्यावर अनेक स्तरातून टीका झाली, ज्यात भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश होता, ज्यांनी अति-डाव्या विचारसरणीच्या आकडेवारीची सत्यता पडताळून पाहिली. अनेकांनी गुजरातच्या शेवटच्या प्रकाशित जनगणनेच्या आकडेवारीचा हवाला दिला, त्यानुसार मुस्लिमांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या किमान १० टक्के होती. पुरस्कार विजेत्या भारतीय-अमेरिकन चित्रपट …
Read More »
Marathi e-Batmya