राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आश्वासन, काँग्रेस पक्ष मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार

महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने या समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, देशात दुखवटा… भाजपा नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अमरावतीत भाजपा नेते आणि मंत्र्यांचे सत्कार सोहळे

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना …

Read More »

सागरी किनारपट्टीच्या समस्या आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय बैठक केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांसह सागरी किनारपट्टीच्या सर्व राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची उपस्थिती

किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. किनारपट्टीवरील मच्छिमारांचे हित जपणे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी किनारी समस्या सोडवणे, त्यांच्या विकास योजना यावर व्यापक चर्चा होण्याच्या दृष्टीने केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या अध्यक्षतेखाली २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथे देशातील सर्व किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर आरोग्यविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे द्यावा

राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच

जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …

Read More »

पहलगामला गेलेल्या पर्यटकांसाठी पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून विमान तर शिंदे हे स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा पुढाकार

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करा पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन …

Read More »

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईत तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती

जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गे मुंबईला पाठविण्यात येत असून दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार …

Read More »

हिंदी भाषेवरून राज्य सरकारची माघारः आता अनिवार्य नाही तर ऐच्छिक राहणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी …

Read More »