लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार …
Read More »आशिष शेलार यांची केंद्राला विनंती, ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करा इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही
“इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष …
Read More »नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी स्थानिक सुटी जाहिर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी
सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २०२५ …
Read More »राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; १२० पर्यटकांशी संवाद राज्यातील ३१ पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी या काँग्रेसमध्ये प्रवेश महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या विचारातून बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेस प्रवेश, मराठवाड्यात काँग्रेसला अधिक बळ मिळेल
राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे …
Read More »गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश, कारवाया वाढवा अमली पदार्थ विरोधात कारवाया वाढविण्यात याव्यात
राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात, अमली पदार्थ विरोधी कृती दलांच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा शोधणे, त्याठिकाणी कार्यालये सुरू करणे, पदभरती करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन पूर्वक कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. मंत्रालय येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम बोलत होते. …
Read More »बेस्ट महाव्यवस्थापकांच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा गोंधळ आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश …
Read More »दादाजी भुसे यांची घोषणा विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण बालमनापासून शिस्त लागावी यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस
राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या …
Read More »संजय शिरसाट यांची माहिती, १२० वसतिगृह २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्न सोहळा संपन्न
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या अधिका-यांची नियुक्ती
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा …
Read More »
Marathi e-Batmya