राजकारण

अजित पवार यांची घोषणा, बारामती राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार

मराठवाडा, विदर्भातील महारोजगार मेळाव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याचे आयोजन अहमदनगर नंतर बारामती येथे करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मागील अनेक …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड

मुंबई ते नागपूर ७०० किलोमिटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. १२ तासात मुंबईहून नागपूरला पोहचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच १२ वाजले आहेत. समृद्धी महामार्ग पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. सातत्याने होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या महामार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार पोलिस स्टेशन चांगले बांधतात पण गृह खाते…

आज पहिल्यांदाच राज्य सरकारच्यावतीने बारामतीत आयोजित नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या होम टर्फवर पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे या नमो रोजगार मेळाव्यात एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले काका शरद पवार आणि पुतणे अजित …

Read More »

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, …

Read More »

नमो मेळाव्यात शरद पवार म्हणाले, नव्या पिढीसाठी रोजगार … गरज

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगार निर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, समृध्दीसाठी वर्षातच २४०० कोटी पुन्हा निविदा ?

राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना २०१४ साली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फायद्यात असणाऱ्या एसआरए आणि म्हाडाच्या ठेव रकमेतील पैशांचा आणि बँकांकडून ५० हजार कोटींचे कर्ज उभारत मुंबई ते नागपूर असा ८०० किमीहून अधिक लांब असलेल्या समृध्दी महामार्गाची उभारणी केली. तसेच या महामार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनी तत्कालीन नगरविकास …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, अंतरीम अर्थसंकल्पातून कंत्राटदारांना पोसण्याचं काम

पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला. अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये खोक्यांसाठी मारामारी

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… पाणीपुरवठा योजनेसाठी एक महिन्यात अहवाल द्या

इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार …

Read More »

संध्या सव्वालाखे यांचा आरोप…भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते परंतु त्यांच्या या योजना फक्त जाहिरातबाजीसाठीच आहेत. महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन जगजाहीर आहे. भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. NCRB च्या अहवालात महिला अत्याचारात ४ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. भाजपा सरकार महिला अत्याचार …

Read More »