लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू होऊन पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही विविध पक्षांनी सुरु झाली. एकाबाजूला भाजपाने विरोधी पक्षातील महत्वपूर्व नेत्यांना पक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला देशाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ऐन निवडणूकीच्या काळात अडचणीत आणताना, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाकडून त्यांना …
Read More »नाना पटोले यांचा पलटवार, फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, थिएटर…
महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत
मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला असा उपरोधिक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतच समझोता नाही
महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. …
Read More »बारामतीत आता नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार मध्ये अधिकृत लढत
बारामती या शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला भाजपाने पध्दतशीर राजकीय ईडी-सीबीआयचा सुरुंग लावल्यानंतर पवार कुटुंबिय कधी नव्हे ते एकमेकांच्या राजकिय विरोधात उभे राहिले. अजित पवार यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत केल्यानंतर एका आठवड्याच्या आत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपासोबत …
Read More »काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश
माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे महायुतीचे उमेदवार भाजपा खा. सुधाकर श्रुंगारे, आ. संभाजी पाटील …
Read More »अरूणाचल प्रदेशमध्ये निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाने १० जागा जिंकल्या
देशात सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जही सर्वपक्षिय उमेदवारांनी भरले आहेत. देशात सार्वत्रिक निवडणूकीबरोबरच काही राज्यांच्या अर्थात अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विधानसभा निवडणूकाही पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर अरूणाचल विधानसभा निवडणूकीत भाजपाने ३० मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून चार उमेदवार आज जाहिर
काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीची पुण्यात जाहिर सभा पार पडली. त्या सभेत आणि इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बारामतीतील उमेदवार या सुप्रिया सुळे असतील अशी …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर यांना परभणी…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते. सुनिल तटकरे …
Read More »राहुल गांधी यांची हमी, …लोकशाहीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर आयकर विभागाने नव्याने काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवित १८०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला. मागील वर्षी आयकर परतावा दाखल आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. एक्स या …
Read More »
Marathi e-Batmya