राजकारण

तब्बल साडे नऊ तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात पुढील चौकशी ईडी कार्यालयात करणार

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानुसार ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता धाड टाकली. या धाडीनंतर तब्बल साडेनऊ तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आल्यानंतर ईडीने राऊत यांना …

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बंडखोरांचे मंत्रीपद जाहिर (फोटो बघाच) राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने बंडखोरांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात दौरा करत बंडखोरांच्या विरोधात चांगलेच रान माजविले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या दौऱ्यावर गेले. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा, मी मुलाखत देईन तेव्हा देशात भूकंप होईल योग्य वेळी बोलेन, आरोप-प्रत्यारोपाची माझी सवय नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत नेत राज्यात सत्ता स्थापन केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. त्यातच उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेवर यापूर्वी चुप्पी साधणाऱ्या शिंदे गटाकडून आता ठाकरे कुटुंबियांना प्रत्युत्तर देण्यास …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न करता दिले ‘हे’ स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर अखेर राजभवनाकडून भगतसिंग कोश्यारी यांचे एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कालच्या वक्तव्याबाबतचे फक्त स्पष्टीकरण दिले. तसेच त्या वक्तव्याबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. अंधेरी मुंबई येथे२९ जुलै २०२२ रोजी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी …

Read More »

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, ते वक्तव्य त्यांचं.. त्याशी आम्ही सहमत नाही

मुंबई आणि ठाणे येथील गुजराती आणि राजस्थानी बाबत मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जाबाबतही वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत एकच खळबळ उडवून दिली. त्याचे पडसादही राज्याच्या राजकिय वर्तुळात पडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारच मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई …

Read More »

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, टोपीचा आणि अंत:करणाचा रंग सारखाच.. काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही

मुंबई आणि ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हे पार्सल पाठवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा मुंबईबद्दलचे राज्यपालांचे वक्तव्य संतापजनक, महाराष्ट्राची माफी मागा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणतायत, राज्यपालांचे ते वक्तव्य योग्यच महाराष्ट्राचा अपमान झाला नाही

मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर …

Read More »

‘राज’ इशारा, कोश्यारींची होशियारी ? राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी दिला इशारा

मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नसल्याचे सांगत नंतर मुंबईला आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना इशारा देत कोश्यारींची होशियारी? असे म्हणत निवडणूकीच्या तोंडावर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, कोश्यारींनी…“कोल्हापूर का जोडा नही देखा” त्यांना दाखविण्याची गरज राज्यपालांच्या वक्तव्यावर उध्व ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यात राजकिय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत …

Read More »