Breaking News

संसद अधिवेशनाला सुरुवात, खासदारांचा शपथविधी, इंडिया आघाडीचा विरोध इंडिया आघाडीकडून संसदेच्या प्रांगणात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी अधिवेशाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर औपचारिक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या खासदारांचा पहिल्यांदा शपथविधी पार पडला. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खाजदारकीची शपथ घेण्याकरीता आल्यानंतर इंडिया आघाडीच्या सदस्यांनी नीट.. नीट.. नीट.. अशा घोषणा दिल्या. तर संसदेत प्रवेश करताना इंडिया आघाडीच्या सदस्यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने केली.

विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या समोरच्या बाजूला इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अयोध्येत भाजपा उमेदवाराचा पराभव करत विजयी झालेले समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद आदी नेते पहिल्या बाकावर बसले होते.

संसदेच्या लोकसभेच्या प्रोटेम अध्यक्षपदी बीजेडीमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आली. भर्तृहारी महताब हे सलग सहा वेळा ओरिसातून निवडूण आलेले आहेत. मात्र लोकसभा निवडणूकीच्या आधी भर्तृहरी महताब बीजेडीतून भाजपामध्ये प्रवेश करत भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली आणि ते विजयीही झाले. भर्तृहारी महताब यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शाह, पियुष गोयल यांच्यासह अनेकांना खासदारकीची शपथ दिली.

दरम्यान संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आपली मोठी ताकद दाखवित एनडीए सरकारला हवे तसे निर्णय आणि कामकाज राबविता येणार नाही असा एकप्रकारे इशाराच दिला.
तसेच यावेळी नॅशनल काँन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी लोकसभेत बोलताना म्हणाले की, सर्व विजयी खासदारांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, संसदीय लोकशाही टीकवेल. देशातील सरकार कुबड्यांवर असून त्यांच्यासमोर सशक्त विरोधी पक्ष उभा आहे.

Check Also

नव्या तीन भारतीय संहितेची अंमलबजावणी सोमवारपासूनः कायद्यातील प्रमुख बदल कोण-कोणते बदल होणार गुन्हे नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेत

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *