पंतप्रधान मोदी मन की बात म्हणाले की, जो राग भारतीयांच्या मनात तोच राग जगात पहलगाम दशतवाद्यांना कठोरात कठोर उत्तर देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ एप्रिल २०२५) त्यांच्या मासिक रेडिओ भाषणात ‘मन की बात’ मध्ये सांगितले.

तीव्र दुःख व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुखावले आहे. “प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. तो कोणत्याही राज्याचा असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या वेदना जाणवत आहेत. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळले आहे असे मला वाटते,” असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या हल्ल्याने दहशतवादाच्या आश्रयदात्यांचा हताशपणा दाखवला आणि त्यांचा भ्याडपणा दाखवून दिला. हे अशा वेळी घडले जेव्हा काश्मीरमध्ये शांतता परत येत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, बांधकामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांची संख्या विक्रमी वेगाने वाढत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या… देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नसल्याचा आरोपही यावेळी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादी आणि दहशतवादाचे सूत्रधार काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी इतका मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात, देशाची एकता, १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उभ्या राहिलेल्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल, असे आवाहनही यावेळी केले.

शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका आवाजात बोलत आहे हे जग पाहत आहे. आम्हाला भारतीय जनतेला जो राग आहे, तोच राग संपूर्ण जगात आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त होत आहेत. जागतिक नेत्यांनी मलाही फोन केला आहे; पत्रे लिहिली आहेत आणि संदेशही पाठवले आहेत. सर्वांनी या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल आणि न्याय मिळेल, असेही शेवटी सांगितले.

https://twitter.com/narendramodi/status/1916410162673262609

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *