वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे आंबेडकरांनी सांगितले. मात्र, आजतागायत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी कोणताही संपर्क साधलेला नाही, याबद्दल प्रकाश आंबेडकर यांची प्रश्न उपस्थित केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपाने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करू नये, असा दबाव आणला आहे का? भाजपाकडे काँग्रेसविषयी असे काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपाला घाबरत आहे? अशी प्रश्नांची सरबतीही यावेळी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत! — हे मी २१ मे रोजी सांगितले होते आणि माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनी सुद्धा १८ जून रोजी तेच सांगितले होते.
पण, आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित… pic.twitter.com/wz8FMuChru
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 28, 2025
प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवे चर्चासत्र रंगले असून, काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी हात पुढे करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Marathi e-Batmya