प्रविण दरेकर यांची टीका, ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ फडणवीसांची चिंता करू नये दरेकरांची संजय राऊतांवर टीका

सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी ट्विट करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली असल्याचा पलटवारही प्रविण दरेकर यांनी केला.

आ. प्रविण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी’ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो अशी खोचक टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं’नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह’ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलच असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत’ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका’च्या सर्टिफिकेटची गरज नाही अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *