Breaking News

प्रविण दरेकर यांचा दावा, जयंत पाटील भाजपा किंवा काँग्रेसच्या वाटेवर लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रविण दरेकर यांचा दावा

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, जयंत पाटील यापूर्वीच भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहित आहे, म्हणून अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात, असा दावाही केला.

तसेच प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, देशातील जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसले. कुठल्याही परिस्थितीत भाजपा ४०० पार होईल याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात. त्यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. महाराष्ट्रात त्यांचे काय होतेय हे पहिले त्यांनी पाहावे. ३४० बोलत असताना तिघांचे मिळून ४० असे कदाचित त्यांना बोलायचे असेल, असा टोलाही लगावला.

इंडिया आघाडीवर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी घोषित केला असता. ज्यांच्यात आजही एकवाक्यता नाही, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नसल्याचे समजतेय. शरद पवार, ममता बॅनर्जी जात नसल्याचे समजतेय. निकालाअगोदर इंडिया आघाडीची अशी अवस्था आहे तर भविष्यात काय होणार, अशी टिका केली.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, महायुतीतील वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत. महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर एकत्रित बैठक होईल आणि कदाचित महायुतीचा म्हणून त्या-त्या विधानपरिषदेचा उमेदवार समन्वयातून जाहीर होऊ शकतो. बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

भुजबळ भुमिका स्पष्ट करणार नाहीत
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, छगन भुजबळ भुमिका स्पष्ट करणार नाहीत. भुमिका स्पष्ट झाली तर कॅमेरे तिथे जायचे बंद होतील. अशी संदीग्ध भुमिका असेल तर मीडियालाही सनसनाटी मिळते. भुजबळ यात माहीर आहेत असेही सांगितले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *