कबुतर खानाप्रकरणी राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागले, जैन… मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी जैन मुनींवर टीका

मुंबईतील कबुतरखान्यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जैन समुदायाने कबुतर खाने पुन्हा सुरु करण्याच्या अनुषंगाने आंदोलन करत आहेत. त्यातच जैन मुनीनीही यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर घेतल्यानंतर कबुतर खान्याचा वाद चांगलाच पेटला. तसेच जैन समुदाय आणि मराठी एकीकरण समिती यांच्यात एकप्रकारे शक्ती प्रदर्शनाची घटनाही नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत त्याप्रमाणे वागावे लागले, जैन मुनींनीही या गोष्टीचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने कबुतर खान्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर त्या प्रमाणे ती गोष्ट झाली पाहिजे असे सांगत काही महानगरपालिकांनी १५ ऑगस्ट रोजी आलेल्या स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत मांस विक्रीवर बंदी घातल्याचा मुद्यावरही आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कबुतरांमुळे कोण कोणते आजार होतात याबाबत अनेक डॉक्टरांनी माहिती दिली. कबुतरांना खायला देऊ नये असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसी कारवाई होणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर कुणी खायला टाकत असेल तर ते चुकीचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, एकाने खायला टाकल्यानंतर बाकिचेही तसेच करणार, मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हवेच कशाला असा सवाल करत काल जैन धर्मियांनी आंदोलन केले. त्यानंतर ही बंदी कायम रहावी यासाठी मराठी संघटनेनेही काल आंदोलन केले. पहिले आंदोलन झाल्यानंतर लगेच पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती. परंतु ते झाले नाही असेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यामध्ये येत आहेत. ते कुणा एका समाजाचे मंत्री नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा मान राखलाच पाहिते असे सांगत आधीच्या आंदोलनात ज्या लोकांनी सुरे वैगेरे आणले होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणही यावेळी केली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांनी केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पत्रकारांनीही धक्काबुक्की केल्याची माहिती मिळत आहे. सरकारला नेमके या प्रकरणात काय करायचे आहे असा सवाल तरत हे कळायला मार्ग नाही. आधी हिंदीचा मुद्दा काढून बघितला, आता त्यानंतर त्यांनी कबुतरे आणली आहेत. पुढे काय काय येते हे पाहू असेही यावेळी सांगितले.

१५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरही राज ठाकरे यांनी टीका करताना म्हणाले की, आमच्या लोकांना हे सर्व ठेवण्यास सांगितले आहे. महापालिकेला अधिकार कुणी दिले असा सवाल करत सांगत कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महापालिकेचे नाहीत असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *