राज ठाकरे यांचा खोचक सवाल, असे कोण जैन लोक आहेत ते कबुतरावर बसून फिरायला जातात ? तुमच्या घरात उंदीर झाले तर काय करता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे सरकारवर सतत टिका करीत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळात निवडणूका लढवण्याचे संकेत दिलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली. याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मुंबईसह प्रमुख शहरातील वाहतुक समस्या, विकास आराखडा कबुतरखाने यावर राज ठाकरे भाष्य करताना म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदार आले तर तुम्ही काय करता असा सवाल करत असे नको ते वाद निर्माण केले जात असल्याचे वक्तव्य केले.

कबुतरखान्याच्या वादावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना.? असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात काय,  कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात, रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता, विषय भरकटवतात असेही यावेळी स्पष्ट केले.  वराह जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी असे मंत्री नितेश राणे यांच्या मागणी बाबत विचारता असे विषय काढून वाद निर्णाण केला जातात, दुसरं काय अशी टीकाही यावेळी केला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पार्किंग, पार्किंगचे दर, मुंबईत वाढणाऱ्या वाहनांची संख्या, रस्ते शहर विकास, मुंबईत बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांवर नियंत्रण. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे, अशा शब्दात राज्य सरकारला सुनावत शहर विकास आणि पार्किंग प्रश्नावर त्यांनी मुद्देसुद भूमिका मांडली. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत. कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहने नियंत्रित कराव्या लागतील, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोज या शहरात माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही. इमारती उंच होत आहे. सी लिंकला पार्किंग लॉट केला होता. काही प्रेशरने काढायला लावला. आमच्यासमोर पार्किंग नको असं धनदांडग्यांनी सांगितलं. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय? माणसं येणारी थांबवली पाहिजे. सरकार नको तिथं भिती दाखवतं असल्याचे सांगत सरकारला फटकारले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *