राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या राज्य निवडणूक आयोगाने जारी केली माहिती

मागील ७ ते नऊ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. तर आज या महानगरपालिकांचे निकाल मतमोजणीनंतर जाहिर करण्यात आले. मात्र आज झालेल्या मतमोजणीत चंद्रपूर, कोल्हापूर वगळता जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी महापालिकांच्या सत्तेच्या चाव्य़ा भाजपाकडे आल्या आहेत.

मात्र या महानगरपालिका निवडणूकीत मात्र एमआयएम पक्षाचे नगरसेवक अनेक ठिकाणी निवडूण आले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवकही लातूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी निवडूण आले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचे स्थान ठळकपणे दिसून आले आहे.

मात्र या निवडणूकीत एखादं दुसरी महापालिका वगळता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडूण आलेले असले तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीचा चांगलाच सफाया झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही प्रमाणात अजित पवार यांचे नेतृत्व स्थापित होऊ शकले नसले तरी शरद पवार यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पुढील काळात सुप्रिया सुळे या पक्षाच्या नेतृत्वात कितपत टीकतील याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही महापालिकांमध्ये खाते उघडता आले असले तरी ते भाजपाच्या मदतीने उघडता आल्याचे दिसून आले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी खातेही उघडता आले नाही.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने यावेळी महाविकास आघाडी ऐवजी स्वतंत्र निवडणूकीचा नारा दिला. त्यामुळे काँग्रेसला चंद्रपूरात भाजपाच्या हाती असलेली सत्ता हिसकावून घेण्यात यश मिळाले. त्याशिवाय कोल्हापूरातही काँग्रेसची सत्ता राखण्यात यश आले आहे. भिवंडी- निझामपूर मधील सत्ताही काँग्रेसने राखली आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या महापालिका निहाय निवडणूक निकालाचा चार्ट खालील प्रमाणे   

About Editor

Check Also

महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले अभिनंदन राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपा अव्वल

अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *