राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या घटनेला आज तेरा दिवस झाले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिर केल्या प्रमाणे आज पत्रकार परिषद घेत या विमान अपघाताचा घटनाक्रम सांगत अजित पवार यांना बारामतीला घेऊन येणारे विमान आधी गुजरातला गेले होते असे सांगत या घटनेच्या मागे गुजरातच्या तर नाही अशी एकप्रकारची शंका उपस्थित केली.
रोहित पवार पुढे म्हणाले की, देशातील व्हीआयपी आणि राजकिय व्यक्तींसाठी विमाने बुक करण्याची निविदा ऐरो आणि अन्य एका कंपनीला देण्यात आली आहे. या दोन कंन्याकडूनच देशभरातील सर्व राजकीय व्यक्तींच्या दौऱ्यासाठी विमाने बुक करण्याचे काम करते. अजित पवार हे बारामतीला येण्याचा दौरा निश्चित करण्यात आला नव्हता. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी बारामतीला विमानाने येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऐरो कंपनीकडून व्हीआरएसचे विमान बुक करण्यात आले. या कंपनीचे मालक हे आधी यापूर्वी दुसऱ्या एका विमान कंपनीत काम करत होते. त्यानंतर या दोघांनी ही कंपनी सुरु केली. अजित पवार यांना बारामतीला घेऊन येणारे विमान या कंपनीचे होते. अजित पवार यांना घेऊन येणारे विमान हे अमेरिकेत बनवलेले आहे. त्यामुळे अशा विमानाबाबत अमेरिकन सरकारचे काही नियम आहेत. तसेच अशा विमानांच्या अपघाताची चौकशी करण्याकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, युरोप आणि कॅनडाच्या अशा मिळून महत्वाच्या तीन एजन्सी असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, तसेच अजित पवार यांना घेऊन येणारे विमान हे ७ वाजून २० मिनिटाला तयार होते. त्यावेळी या विमानाचा एक पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता. मात्र व्हीआरएस कंपनीने या विमानासाठी नियुक्त करण्यात आलेले दोन्ही पायलट अचानक बदलले. त्यामुळे एक पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना दोन्ही पायलट का बदलले असा सवालही यावेळी उपस्थित केला.
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद |🗓️10-02-2026 https://t.co/9XAKinUZZx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026
रोहित पवार यांनी यावेळी विमानाच्या उड्डाण झाल्यानंतरच्या प्रवासाच्या दरम्यानची माहिती देताना सांगितले की, अजित पवार आणि त्यांचा अंगरक्षक विपिन जाधव हे विमानात होते. त्यांचे सामान विमानाच्या डाव्या बाजूला ठेवण्यात आले होते. मुंबईतून विमानाने उड्डाण करण्यापूर्वी बारामती विमानतळावर फोन करून चौकशी केली की, व्हीसीबिलीटी आहे का म्हणून त्यावेळी बारामती विमानतळावरून त्यांना व्हीसीबीलीटी असल्याचे सांगितले. त्यानुसार विमानाने उड्डाण केले.
पुढे रोहित पवार म्हणाले की, डिजीसीए आणि इतर एजन्सीच्या नियमानुसार विमानाचे कॉक पीट मधील व्हाईस रेकॉर्डिंग बंद होते असा दावा केला. तसेच विमानातील गोष्टी या पूर्ण क्षमतेच्या कार्यरत नव्हत्या असा आरोपही यावेळी करत पुढे म्हणाले की, बारामती विमानतळाच्या जवळ जेव्हा हे विमान आले त्या वेळी व्हीसीबीलीटी आहे का अशी विचारणा खाली विमानतळावर करण्यात आली. त्यावेळी विमानतळाने ३ किलोमीटर पर्यंत व्हीसीबीलीटी असल्याचे सांगितले. तसेच विमानातील अर्लट देणारी यंत्रणाही बंद होती. मूळ पायलट कपूरने विमान उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी विमानाचे एक बटन बंद केले. त्यामुळे सरळ रेषेत खाली येत असलेले विमान वाकडे होऊन खाली पडयला लागले तरी विमानात पायलटकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. परतु विमान कोसळण्याच्या काही सेंकद आधी कपूर यांच्यासोबत असलेली सह वैमानिक पाठक हिने शीट असा शब्द प्रयोग दोन-तीन वेळा केल्याचे एटीएसच्या रडारच्या रेकॉर्डींगमध्ये ऐकायला मिळते.
रोहित पवार पुढे म्हणाले की, त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात पायलट कपूर, विमान बुकींग कंपनी ऐरो आणि दिल्लीच्या कंपनीने ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा संशय व्यक्त केला. या विमान अपघाताची चौकशी खर तर तंत्रज्ञ असलेल्या असलेल्यांकडून केली जायला पाहिजे होती पण याची चौकशी सीआयडीकडून करण्यात येत आहे. सीआयडी एखाद्या गुन्हे प्रकरणी चांगली चौकशी करू शकते पण विमानासारख्या तांत्रिक बाबतीत कितपत चौकशी करण्यास मर्यादा येत असल्याचे सांगत यासंदर्भात सीआयडीतील अधिकाऱ्यांशी यासंदर्भात आम्ही बोललो त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी आता आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज ते ही बारामती विमानतळावरील गोळा केल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, परंतु ज्या ठिकाणी विमानाचे हॅंगर असते, तेथील सीसीटीव्हीचे फुटेज कोठून घेणार असा सवालही यावेळी करत विमान कंपनी व्हीआरएस, ऐरो कंपनी आणि पायलट कपूर यांच्यावर आमचा प्रमुख संशय असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya