अफवांवरील चर्चेला संजय राऊत यांचे उत्तर, एक तर बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला भाजपाचा खोटारडेपणाः महाविकास आघाडीत २१० जागांवर एकमत

सकाळपासून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची आणि संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांवर सुरु होते. या वृत्तावर अखेर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) विधानसभेच्या २८८ पैकी २१० जागांवर एकमत झाले आहे, ही एक महत्त्वाचे असल्याचे सांगत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधत पुढे बोलताना म्हणाले की, राज्याची लूट करणाऱ्या शक्तींचा पराभव करणे हे एमव्हीएचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की म्हणाले, ‘आमचे २१० जागांवर एकमत झाले आहे. ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. एकजुटीने निवडणुका लढवण्याचा आमचा उद्देश असून महाराष्ट्राला लुटणाऱ्या शक्तींचा आम्ही पराभव करू. महाविकास आघाडी ही विरोधी पक्षांची युती आहे, ज्यात शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजपा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असल्याचे सांगितले.

राज्यसभा खासदार राऊत यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा उद्धव ठाकरेंचा पक्ष एमव्हीएपासून वेगळा होऊन सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसांपासून तीन प्रमुख विरोधी पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनाउबाठा एकाच पानावर असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राऊत यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि शिवसेना (यूबीटी) – भाजपा पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, अशीही अटकळ होती. २०१९ पूर्वी दोन्ही पक्षांची अनेक दशके युती होती.

या चर्चेवर बोलताना संजय राऊत यांनी ही अटकळ फेटाळून लावत भाजपावर खोटेपणा पसरवल्याचा आरोप करत पुढे म्हणाले की, भाजपाला निवडणुकीतील पराभवाची भीती आहे, त्यामुळे खोटी माहिती पसरवली जात आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी युती तोडली. त्यावेळी अविभाजित शिवसेनेने भाजपावर मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल वाटून घेण्याच्या आश्वासनापासून मागे जात असल्याचा आरोप केला होता. असा कोणताही करार झाल्याचे भाजपाने सातत्याने नाकारले होते.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाने जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून राज्याची लूट करणाऱ्या गद्दारांना सरकार सोपवून भाजपाने सर्वात वाईट कृत्य केले, आमचा (उद्धव गटाचा) सर्वात मोठा संघर्ष भाजपाशी झाला आहे. अशा चुकीच्या माहितीचा महाविकासआघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेशी काहीही संबंध नाही. शिवसेने उबाठा विरोधात काही काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्यांबद्दल विचारले असता, राऊत म्हणाले की, काँग्रेसचा नेता अशी टिप्पणी करू शकतो याचे मला आश्चर्य वाटले.

तसेच संजय राऊत यांनी पुढे बोलताना म्हणाले की, अशी खोटी माहिती बोलणारा नेता एका बापाचा असू शकत नाही. तसेच अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटीचा पुरावा दाखवावा असे आव्हान देत एकतर बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला अशी खोचक टीकाही यावेळी भाजपावर केली.

About Editor

Check Also

रविंद्र चव्हाण यांचा इशारा, भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई भाजपामधून फुटून सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *