शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडून मुंबईत पक्षाची बैठक बोलावली.

यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता म्हणाले की, यासंदर्भात सुनेत्रा पवार आणि आपली कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच त्या उपमुख्यमंत्री पदा ज्या काही चर्चा एकतोय त्या मुंबईत होत आहेत. मी इथे बारामतीत आहे. मुंबईत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे हे पत्राचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतं आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नसल्याचेही सांगत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट बोलणे टाळले.

दरम्यान, आज जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत त्यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केल्याची माहिती दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सात-आठ वेळा बैठक झाल्याचे सांगितले.

त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता शरद पवार पुढे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाबाबतचा निर्णय १२ तारखेला जाहिर करण्यात येणार होता असेही यावेळी सांगितले.

तसेच शरद पवार यांना भाजपाबरोबर जाणार होते का असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणानंतर भाजपाबरोबर जाण्याचा काय संबध, आमची जी चर्चा सुरु होती त्यात असा कोणताही प्रश्न चर्चेत नव्हता असेही यावेळी स्पष्ट केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, चार महिन्यापासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षाच्या विलनीकरणाची चर्चा करत होते. मात्र मध्येच ही दुर्दैवी घटना घडली. आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असे दिसते असे वक्तव्य करत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याच्या हालचालीवरून दोन्ही गटाच्या विलनीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो असे सूचित केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *