Breaking News

शरद पवार यांचा पलटवार, तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात… आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका

पुणे येथे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देशातील भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका केली होती. अमित शाह यांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज या टीकेची परतफेड करत तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात राहिल्याचे आम्ही पाहिले अशी खोचक टीका केली.

छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना पलटवार केला.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना सवाल केला की, अमित शाह यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार असल्याची टीका केल्याबाबत विचारले. त्यावर शरद पवार म्हणाले की, गुजरातमधून तडीपार झालेला व्यक्ती देशाच्या गृहमंत्री विराजमान झाल्याचे आपल्याला पाह्यला मिळत आहे.  यावरून भाजपाचे प्रदेसाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, सुर्याला दिवा दाखविण्यासारखे असल्याचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर शरद पवार यांनी पुन्हा पलटवार करत म्हणाले की, तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात राहिल्याचे आम्ही पाहिले अशी टीकाही खोचक शब्दात केली.

तसेच यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एक, दोन हप्ते महिलांना दिले जातील. त्यानंतर दिला जाणार का? हा प्रश्न आहे. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये आहे, असल्याचे लाडकी बहिण योजनेवर सवाल उपस्थित केल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

तसेच अजित पवार गटासोबत गेलेले विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रांनी हे पुन्हा स्वगृही परतत असल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, ज्यांची भावना बदलेली आहे आणि मूळ पक्षाचा विचाराशी बांधिलकी मानत कोणी परत येत असेल तर त्याचे स्वागतच करू असे सांगत मात्र काही लोकांनी टोकाची भूमिका घेत सोडून गेलेल्यांच्या बाबत सरसकट करता येणार नसल्याचे सांगत आता आमच्या पक्षातील नेते कोणालाही परत पक्षात घ्यायचे नाही अशी भूमिका असल्याचे स्पष्ट करत परंतु याबाबत आमच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे. शिवाय आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन समाजात दरी निर्माण होते की काय असे चित्र आहे. विशेषतः मराठवाड्याच्या दोन ते तीन जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. याप्रकरणी चर्चा आणि संवाद होणे महत्वाचे असल्याने सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, आरक्षणावर मतभेद नाही. काही गोष्टी अशा आहेत की मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे. दोन वर्गात अंतर वाढतं की काय अशी स्थिती मला दिसते. मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल अमूक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर दुसऱ्या समाजाची व्यक्ती तिथे जात नाही. हे खरं असेल तर ते चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे. अशी भूमिकाही यावेळी मांडली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटपात तडजोडीसाठी जी समिती नियुक्त करण्यात येणार आहे त्यात शिवसेनकडून संजय राऊत यांनी तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी नावं दिली आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावं दिली आहेत. याबाबत १२ ताररेखनंतर बैठक होईल. काही झालं तरी एकवाक्यता ठेवायची, जागांबाबत निर्णय घ्यायचा आणि लोकांना पर्याय द्यायचा असं तिन्ही पक्षांचं ठरलं असल्याचंही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभेत आम्ही एकसंघ राहिलो. लोकांना पर्याय दिला. त्याच पद्धतीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याला आता मूर्त स्वरुप आले पाहिजे. असे जर घडले तर लोकसभेसारखीच स्थिती दिसून येईल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, परंतु, लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही असेही यावेळी भाकित केले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *