नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. तसेच १६० खासदार निवडून आण्याचे आश्वासन दिले. त्यावर आम्ही नकार दिल्याचा गौस्फोट केला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे. भाजपाकडून नाही असे सांगत भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच पुढे बोलताना शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला की, विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्तींनी आम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असा मोठं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या या विधानावर राजकिय वर्तुळात एकच खळबळ माजली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मात्र मला आजही वाटतंय विधानभेच्या निवणूका जाहिर झाल्या. त्या आधी दिल्लीत मला दोन व्यक्ती भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या दोन व्यक्तींनी सांगितलं की, महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. त्यापैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो, त्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. सांगायचं झालं तर त्या लोकांनी१६० जागांची गॅरंटी दिली तरी माझ्या मनात निवडणूक आयोगाबद्दल शंका नव्हती. त्यामुळए त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. त्या लोकांची राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर लोकांना जे काय बोलायचं होतं ते राहुल गांधी यांच्याशी बोलले. परंतु राहुल गांधी आणि माझं मत असं होतं की, याबाबत आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्यासमोर जाऊ आणि लोकांचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळेल याचा निर्णय घेतल्याचेही यावेळी सांगितले.
दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो. याबाबत सांगायचं तर मी कालपासून बघतोय दिल्लीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. मात्र उद्धव ठाकरे कुठे बसले होते यावरून राजकारण सुरु आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेझेन्टेशन केले, आता प्रझेन्टेशन पहायाल केलं गेलं तर कोणी पहिल्या रांगत बसत नाही जसं चित्रपट पहायला गेल्यानंतर आपण मागे बसतो. त्याच पध्दतीने उद्धव ठाकरे मागे बसले होते. मी स्वतही मागेच बसलो होतो. तात्पूर्य काय तर स्क्रिन जवळ आपण बसत नाही. मात्र उद्धव ठाकरे कुठे बसले यावरून राजकारण करण्यात येत असल्याबाबत खंत व्यक्त केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांनी अतिशय कष्ट करून मतदार नोंदणीच्या प्रक्रियेतील माहिती सांगितली. एका ठिकाणी एकच राहते. पण त्या ठिकाणाहून ४० लोक मतदान केल्याचं उघडकीस आणलं. अशाच प्रकारची उदाहरणे राहुल गांधी उघडकीस आणली. हे करताना राहुल गांधी यांनी नुसतेच आरोप केले नाहीत तर त्यासाठी आधारही दिला. पण निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र द्यावं अशी मागणी केली. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यावर राहुल गांधी यांनीही आपण संसदेत शपथ घेतली आहे त्यामुळे वेगळ्या शपथपत्राची गरज नाही. तरीही निवडणूक आयोग शपथपत्रासाठी आग्रह धरत असेल तर ते योग्य नाही. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाच्या खोलवर जाण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझा एक आक्षेप आहे. प्रश्न,आक्षेप निवडणूक आयोगाबाबत आहेत, तर भाजपा नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस हे उत्तर देण्यासाठी पुढे का येतात त्याची गरज काय असा सवाल करत आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवायं भाजपाकडून नाही असा उपरोधिक टोलाही भाजपाला यावेळी लगावला.
Marathi e-Batmya