मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आदेश जुनाच

महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे.

जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे; परंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या १४ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील; परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समुहानेदेखील फिरता येणार नाही.

दरम्यान, यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये प्रचार तोफा थंडावल्यानंतर मतदानाच्या एक दिवस आधी उमेदवारास प्रचार करण्यास आणि मतदारांना भेटण्यास निवडणूक आयोगाकडून मज्जाव करण्यात येत असे. मात्र आता निवडणूक आयोगाकडून नवा आदेश काढत उमेदवारांना मतदारांना भेटण्याची परवानगी दिली आहे. हा नवा आदेश कोठून आला असा सवाल करत निवडणूक आयोग आता नवनवे आदेश घेऊन येत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, कदाचित उमेदवारांनी मतदारांना निवडणूकीच्या प्रचाराऐवजी मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखविण्यासाठी भेटावे अशी कदाचित निवडणूक आयोगाची इच्छा असावी आणि त्यासाठीच निवडणूक आयोगाने हा नवा आदेश जारी केला आहे का अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *